Chiplun : चिपळुणात टायफाईडसह विविध आजारांची साथ

चिपळूण : शहर परिसरात वातावरणातील विस्कळीतपणामुळे गेले काही दिवस विविध साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. व्हायरल इन्फेक्शनसह टायफॉईडच्या साथीचे रुग्ण खासगी दवाखान्यांतून उपचार घेताना आढळून येत आहेत. गेले महिनाभर शहरात पावसाने ठाण मांडल्यामुळे अनेकांना सर्दी, ताप, डोकेदुखी, खोकला यासह काविळ आजाराचे रुग्ण खासगी दवाखान्यातून उपचार घेत आहेत.

गणेशोत्सवापूर्वीपासून चिपळूण शहर परिसरात पावसाने संततधार मुक्काम ठोकला आहे. क्वचितच कधीतरी उघडीप आणि काही प्रमाणात सूर्यदर्शन; परिणामी वातावरण विस्कळीत होण्याचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात व्हायरल इन्फेक्शनची साथ असून या बरोबरच सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी, ताप आदींचे रुग्ण आढळून येत आहेत. काही प्रमाणात शहरात टायफॉईड आजाराचे रुग्ण आहेत. विविध आजारांनी त्रसत असलेले रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. काही दिवसांपूर्वी काविळची साथ पसरली होती; मात्र डासांपासूनचे साथीचे आजार गतवर्षीच्या तुलनेत आढळून येत नाहीत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 01/Oct/2025