गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत भगवतीनगर येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार मोहिमेंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात १२९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यातील ४८ नागरिकांची नेत्र तपासणी करून पैकी ८ नागरिकांना मोतीबिंदू असल्याचे निदर्शनास आले. ९८ नागरिकांच्या रक्ता तपासण्या झाल्या.
गरजुंना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. मोतीबिंदू दोषीत रुग्णांची जिल्हा रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. या अभियानात महिलांच्या तपासणीत उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी, क्षयरोग, निमिया व सिकल सेल स्क्रीनिंग, गरोदर मातांची तपासणी व समुपदेशन, लसीकरण सेवा, मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, पूरक आहार व आरोग्यदायी आहार पद्धती याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पणकुटे, डॉ. मुक्तेश्वरी पाखरे, नेत्र चिकित्सक डॉ. संदीप उगवेकर, डॉ. परशुराम निवेंडकर, सीमा पाडवी, अक्षता शिर्षेकर, मनाली तारवे, माधुरी ठाकरे, सुरेश अंबुरे, दीपा गावडे, अश्विनी गोवळकर, अर्चना आपकरे, स्वाती कदम, श्रुतिका मोहिते, गट प्रवर्तक आढाव उपस्थित होत्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 01/Oct/2025














