Chiplun : नारदखेरकी येथे शेतकऱ्यांना यांत्रिक कृषी अवजारांचे वाटप

रामपूर : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व वसुंधरा पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत नारदखेरकी ग्रामपंचायत व नारदखेरकी पाणलोट विकास समितीच्यावतीने शेतकऱ्यांना पॉवर विडर, ब्रश (ग्रास) कटर, कृषी पंप, चैन सॉ-कटर, कडबा कुट्टी, बायोगॅस युनिट अशा यांत्रिक कृषी अवजारांचे वाटप नुकतेच करण्यात आले.

शेतकऱ्यांनी शेती, फळबाग लागवड, प्रक्रिया युनिट, ओसाड जमीन जल सिंचनाखाली आणणे, पिकांना बाजारपेठ नियोजन व मागणी, पर्यटन आणि जलसिंचन बंधारे, शेततळे, महाडिबीटी पोर्टलवरील योजना, अॅग्रीस्टॅक (फार्मर) कार्ड नोंदणी याविषयी मंडळ कृषी अधिकारी दत्तात्रय आवारे व नारदखेरकीचे सरपंच राघो आंबवकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना फायदेशीर व लाभदायक असे मार्गदर्शन केले.

यावेळी कृषी अधिकारी दत्तात्रय काळे, कृषी सेवक अमितकुमार मोटे, कृषी तज्ज्ञ अमित कोंडे, सुवर्णा गोरुले, अभियंता प्रतीक भुवड, पाणलोट विकास समितीचे सचिव संतोष हातिस्कर, तंटामुक्त समिती अध्यक्ष रघुनाथ चाळके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 01/Oct/2025