Ratnagiri : पाली ग्रामपंचायतीमध्ये ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अंतर्गत आज आरोग्य शिबिर

पाली : प्राथमिक आरोग्य केंद्र खानूअंतर्गत आरोग्य उपकेंद्र, पाली यांच्यावतीने ग्रामपंचायत पाली येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ या मोहिमेंतर्गत बुधवारी (ता. १) सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये आरोग्य तपासणी शिबिर पार पडणार आहे. शिबिरात सर्व ग्रामस्थांची रक्त तपासणी याबरोबरच आरोग्य, ईसीजी, संसर्गजन्य आजार एनसीडी, बीपी, शुगर, कॅन्सर, किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी व समुपदेशन, पोषण आहार इत्यादींची माहिती, गर्भवतींची तपासणी इत्यादी बाबी पार पडणार आहेत.

नागरिकांनी आधार कार्ड व आधार क्रमांक लिंक असलेला मोबाईल व रेशनकार्ड घेऊन येण्यास सूचित केले आहे. ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र खानू आरोग्य उपकेंद्र, पाली व ग्रामपंचायत पाली यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 01/Oct/2025