Ratnagiri : रस्ता ओलांडणाऱ्या ८ वर्षीय मुलाला दुचाकीची धडक

रत्नागिरी : रस्ता बेदरकारपणे दुचाकी चालवून ओलांडणाऱ्या ८ वर्षीय देवांश शैलेश वरवडकर या लहान मुलाला धडक देत अपघात केला. याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० ते २.४५ वा. कालावधीत रत्नागिरी ते गणपतीपुळेला जाणाऱ्या रस्त्यावरील कासारवेली येथील शाळेसमोर घडली.

याबाबत जखमी मुलाचे वडील शैलेश बाळकृष्ण वरवडकर (४६, रा. कासारवेली, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी दुपारी शैलेश वरवडकर हे मुलगा देवांश सोबत कासारवेली येथील शाळेसमोर रस्ता ओलांडण्यासाठी उभे होते.

त्यावेळी अज्ञात दुचाकी चालक त्याच्या ताब्यात दुचाकी बेदरकारपणे चालवत रत्नागिरी ते गणपतीपुळे असा भरधाव वेगाने जात होता. तो कासारवेली शाळेसमोर आला असता त्याने देवांशला ठोकर देत अपघात केला. त्यानंतर त्याला कोणतीही वैद्यकीय मदत न करता त्या अज्ञात दुचाकी चालकाने पळ काढला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 01/Oct/2025