Khed : भाडेकरू दांपत्याने घरमालकास घातला दोन लाखांचा गंडा

खेड : तालुक्यातील खवटी-सतीचा कोंड येथील अनिता दीपक शिंदे यांना त्यांच्याच घरी राहणाऱ्या भाडेकरू दांपत्याने तब्बल २ लाख ४ हजार ७०० रुपयाला गंडा घातला. याची रीतसर फिर्याद अनिता शिंदे यांनी येथील पोलिस ठाण्यात २९ सप्टेंबरला सायंकाळी दिली. याप्रकरणी संशयित आशिष तुळशीराम दोडके व स्वरूपा आशिष दोडके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ ते १८ सप्टेंबर या दरम्यान घडली आहे.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत भाडेकरू दांपत्य आशिष तुळशीराम दोडके व स्वरूपा आशिष दोडके यांनी फिर्यादी अनिता दीपक शिंदे यांच्या राहत्या घरातून १ लाख २० हजाराचा सोन्याचा लक्ष्मीहार, प्रत्येकी ४० हजाराच्या दोन सोन्याच्या अंगठी, ३ हजार ५०० रुपयांची भांडी व १ हजार २०० रुपयांचा दोन सिलिंडर, एक गॅस शेगडी असा २ लाख ४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. अधिक तपास येथील पोलिस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 01/Oct/2025