Chiplun : चिपळुणात पावसामुळे १६.८० हेक्टर शेतीचे नुकसान

चिपळूण : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने नाचणी व पाण्याखाली गेली असून, तब्बल १६.८० हेक्टर क्षेत्रातील भातपिकांचे नुकसान झाले आहे.

या आपत्तीचा १०० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास वाया गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. मे महिन्याच्या अखेरीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने पेरणी उशिरा झाली. अनेक ठिकाणी रोपे कुजून गेली आणि शेतकऱ्यांना दुवार पेरणीचा खर्च करावा लागला. मोठ्या कष्टाने उभी केलेली पिके आता पाण्याखाली गेली आहेत. तयार झालेले शेती कापून घरी घेऊन जाण्यासाठी शेतकरी घाई करत आहेत.

चिपळूण तालुक्यातील डोंगराळ भाग सर्वाधिक बाधित झाला असून शंभरहून अधिक शेतकरी संकटात सापडले आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनी दिली. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रामुख्याने मागील आठ दिवस सुरू असलेल्या पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकर नुकसान झाले आहे. सप्टेंबर अखेरीसही पावसाचा जोर कायम असल्याने शेतकरी हवालदिल आहे. भाताची रोपे आडवी झाली आहेत. पिके नष्ट झाल्यामुळे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले आहेत.

चिपळूण तालुक्यात मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नाचणी आणि भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून सुरू आहेत. संपूर्ण नुकसानीचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवला जाईल. शत्रुघ्न म्हेत्रे, तालुका कृषी अधिकारी, चिपळूण.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 01/Oct/2025