मंडणगड : चिरेखाण व्यावसायिकाकडून घेतलेले ११ लाख ७० हजार रुपये परत न दिल्याने चेतन गुलाबराव कोंडे (रा. नांदगाव, ता. महाड, मूळ गाव खेड शिवापूर, पुणे) याच्या विरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत धुत्रोली येथील व्यावसायिक अजीम कडवेकर (वय ४४) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीतील माहितीनुसार घटनेतील संशयिताने फिर्यादी यांच्याकडून १४ जुलै २०२१ ते २१ जुलै २०२५ या कालावधीत के. के. मल्हार डेअरीचे खात्यावर १० लाख रुपये घेतले होते. तसेच आवश्यक कामासाठी लागणारे १ लाख ७० हजार रुपयांचे चिरे (जांभा दगड) घेतले होते. ११ लाख ७० हजार रुपये येणे असल्याने कडवेकर यांनी कोंडे यांच्याकडे या रकमेची मागणी केली, मात्र ही रक्कम देण्यास संशयिताने वारंवार टाळाटाळ करून फसवणूक केली. या संदर्भात कोंडे यांच्या विरोधात मंडणगड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 01/Oct/2025














