युवा नेते सौरभ मलुष्टेंना उद्योगमंत्री उदय सामंतांच्या हस्ते वाढदिवसाच्या शुभेच्छा; सामाजिक कार्याचे केले कौतुक

रत्नागिरी : शहरातील युवा नेते आणि दांडगा जनसंपर्क असलेले सौरभ मलुष्टे यांचा वाढदिवस आज, (बुधवार), त्यांच्या मित्रपरिवारात आणि हितचिंतकांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सकाळपासूनच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्यामुळे हा दिवस अधिकच खास ठरला.

उद्योगमंत्री उदय सामंत आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत त्यांनी युवा नेते सौरभ मलुष्टे यांना वाढदिवसानिमित्त आवर्जून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन मलुष्टे यांचा सत्कार केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंत्री महोदयांनी सौरभ मलुष्टे यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. तरुणांमध्ये मिळून मिसळून सामाजिक बांधिलकी जपत करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

या सदिच्छा भेटीवेळी प्रांताधिकारी जीवन देसाई, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सौरभ मलुष्टे यांचा सर्वपक्षीय आणि सर्व स्तरातील लोकांशी दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार आणि हितचिंतकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच सोशल मीडिया, फोन कॉल्स आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:14 01-10-2025