चिपळूण : नमन ही कोकणची ओळख असणारी लोककला आहे. गेली अनेक वर्ष नमन लोककला सादर होत आहे. आता या नमन लोककलेवरतीच अतिशय मेहनत घेत नमन कलेचा इतिहास मांडणारे पुस्तक प्राध्यापक संतोष गोनबरे यांनी लिहिले आहे. त्यांनी लिहिलेल्या ” नमन कोकणची समृद्ध लोक संस्कृती” या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता श्री शिवानंद जठार सिद्धगिरी मंगल कार्यालय हातखंबा येथे मराठी राज्यभाषा व उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार असल्याचे नमन लोककला रत्नागिरी जिल्हा (मातृसंस्था) या संस्थेने सांगितले.
कोकणातील नमन लोककलेचा इतिहास आता पुस्तक रुपी सर्वांसमोर येणार आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तो हस्तांतरित होणार आहे. तो जपण्यासाठी आपण कलाकारानी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक संतोष गोनबरे यांनी अतिशय मेहनत घेत या पुस्तकाची निर्मिती केली आहे.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद कोकण प्रतिनिधी इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ कार्यवाह सुनिताराजे पवार, भाषा अभ्यासक आणि साहित्यिक अरुण इंगवले, लोककला अभ्यासक आणि लेखिका डॉ. निधी पटवर्धन, लोककला अभ्यासक आणि पत्रकार अमोल पालये लोककलावंत सुनील बेंडखळे, त्याचबरोबर चला हवा येऊ द्या मध्ये अभिनय केलेले सचिन काळे आधी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पुस्तक सोहळ्यासाठी नमन लोककलावंत आणि नमन लोककला रत्नागिरी जिल्हा या मातृसंस्थेच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहावे असे सुचित करण्यात आलेले आहे. या पुस्तक प्रकाशाचे निमंत्रण नमन लोककला रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे, सचिव परशुराम मासये, सहसचिव पत्रकार संतोष कुळे, उपाध्यक्ष मोहन घडशी, उपाध्यक्ष युयुत्सु आर्ते यांनी कलावंतांना उपस्थित करण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:11 PM 01/Oct/2025














