Khed : विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

खेड : नोकरी नसल्याच्या मानसिक तणावामुळे खेड बसथांब्यावर दारूच्या नशेत उंदीर मारण्याचे रेटॉल हे औषध पिलेल्या एका २७ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संकेत रवींद्र कदम (रा. पिंपळवाडी-मोरवंडे, खेड) असे त्याचे नाव आहे.

ही घटना १२ सप्टेंबर रोजी घडली असून, प्रथम कळंबणी येथे उपचार करून मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्याचा १३ रोजी मृत्यू झाला. याबाबत खेड पोलिस स्थानकात २९ रोजी नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 01/Oct/2025