दापोली : नदीच्या पुलाच्या शेजारी एका झाडाच्या आडोशाला बसून मद्यपान करणाऱ्या एका ३८ वर्षीय प्रौढावर दापोली पोलिसांनी दारुबंदी कायद्यान्वये कारवाई केली. विनय विलास सुर्वे (रा. लाडघर-दत्तवाडी, दापोली) असे त्याचे नाव आहे.
ही कारवाई सोमवारी सायंकाळी बुरोंडी तामसतीर्थ येथे करण्यात आली. संशयिताकडे मद्यपान करण्याचा कोणताही परवाना नसतानाही तो मद्यपान करत असताना पोलिसांना सापडला. याप्रकरणी कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर मडके यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:59 PM 01/Oct/2025














