गुहागर : प्राथमिक आरोग्य केंद्र तळवली अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर वडद येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार मोहीम राबविण्यात आली. या अभियानामध्ये सुमारे 103 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 23 पुरुष तर 80 स्रियांचा समावेश होता.
सदर अभियानाचे उद्घाटन उपसरपंच संदीप धनावडे, स्त्री रोग तज्ञ डॉ. गीता कराड, आरोग्य सहाय्यक मदन जानवळकर, वडद उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी दत्ता मुळे, डॉ. राजेश मोहिते, डॉ. भरत शेळके, आरोग्य सेवक लक्ष्मण खरवडे तसेच सर्व आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:59 PM 01/Oct/2025














