रत्नागिरी : जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे २२ नोव्हेंबर रोजी आयोजन

रत्नागिरी : युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. राज्यात सन २०२४-२५ या वर्षातील युवा महात्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, नेहरू युवा केंद्र संघटन व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे.

युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करुन राज्याचा प्रातिनिधिक चमू राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पाठविण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघाने राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी ‘विज्ञान व तंत्रज्ञान यामधिल नवसंकल्पना’ ही संकल्पना दिलेली आहे. या संकल्पनेवर आधारित जिल्हा युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने २२ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरिता १५ ते २९ वयोगटातील युवक युवतींना सहभागी होता येईल (१२ जानेवारी, २०२५ या दिनांक रोजी वयाची परिगणना १५ ते २९ असावी). युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपली स्पर्धापूर्व नाव नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे करावी. जिल्हास्तर युवा महोत्सवाची नियमावली गुगल लिंकवर देण्यात आली असून युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरीता नाव नोंदणी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdMYx0id6iPnBAgVisloUKTqKL- vCI0m1SRUCOWDIcLWn_Yow/viewform?usp=sf_link या गुगल लिंक फॉर्ममध्ये १९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत भरावी.

युवा महोत्सवामध्ये स्पर्धात्मक बाबींचे आयोजन करण्यात येणार आहे. संकल्पना आधारीत स्पर्धा विज्ञान व तंत्रज्ञान यामधिल नवसंकल्पना सांस्कृतिक समुह लोकनृत्य, वैयक्तिक सोला लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक सोलालोकगीत. कौशल्य विकास – कथा लेखन, चित्रकला, वक्तृत्व (इंग्रजी व हिंदी), कविता. युवा कृती हस्तकला, वस्त्रोद्योग, अॅग्रो प्रोडक्ट जिल्ह्यातील कनिष्ठ / वरिष्ठ महाविद्यालयातील व कृषी महाविद्यालयातील जास्तीत जास्त युवक युवती / संघांनी, महिला मंडळ यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:30 PM 22/Oct/2024