Sangameshwar : माखजन बीट अंतर्गत अंगणवाडी सेविकांसाठी राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे माखजन बीट अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविकांसाठी राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस व पूरक पोषण आहार कसा द्यावा, त्या मुलांच्या पालकांना आहाराविषयी कसे मार्गदर्शन करावे, किशोरवयीन मुलींना आहार कसा असावा, आरोग्याची काळजी कशी घ्यावी, गरोदर व स्तनदा मातांना पूरक व पोषक आहार देण्याची योग्य पद्धत कोणती व कोणती काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

रानभाज्या व त्यांचे महत्त्व, त्या बनवण्याच्या पद्धतीविषयी मार्गदर्शन झाले. याप्रसंगी सकस पोषण आहारांतर्गत खाद्यपदार्थांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या कार्यक्रमाला पर्यवेक्षिका आर. आर. पेजे, बीट प्रमुख चेतना वेले आदी उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 02/Oct/2025