कडवई : ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत तुरळ येथील ग्रामपंचायतीत महिला आरोग्य तपासणी व उपचार शिबिर पार पडले. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, रक्तक्षय, स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी, गर्भवती व स्तनदा मातांसाठी पोषण सल्ला, आहार मार्गदर्शन, आयर्न फोलिकी गोळ्या वितरण, लसीकरण सेवा दिल्या.
यावेळी तुरळ सरपंच सहदेव सुवरे, ग्रामसेवक विशाल भुयेकर यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिर यशस्वी करण्यासाठी कडवई आरोग्य केंद्राचे डॉ. हेमंत रेवाळे, सिस्टर रंजना घाग, वैशाली पुरोहित, आशा सेविका साक्षी लिंगायत, समुदाय विकास अधिकारी बालाजी गुट्टे, अमोल मस्के, हर्षवर्धन व्यवहारे, आरोग्य सेवक संतोष जोनावल, अभिजित कदम यांनी मेहनत घेतली. यावेळी रमेश डिके, संतोष जाधव, तुकाराम येलोंडे, कृष्णा नाडकर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 02/Oct/2025














