चिपळूण : गुंतवणुकीवर 3 ते 7 टक्के प्रतिमाह व्याज देण्याचे आमीष दाखवून राज्यात टीडब्ल्यूजे कंपनीने गुंतवणूकदारांकडून करोंडोची गुंतवणूक केली. मात्र, अलिकडच्या काही काळात गुंतवणूकदारांमध्ये फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली. यवतमाळ येथे टीडब्ल्यूजे कंपनीविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. चिपळूण पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांकडे देण्यात आला आहे. या शाखेतील अधिकारी व कर्मचार्यांनी मंगळवारी (दि. 30) चिपळूणमध्ये भेट देऊन गुहागर बायपास येथील टीडब्ल्यूजेच्या चिपळूण शाखेची पाहणी केली व पंचनामा केला. त्यामुळे आता या तपासाला वेग आला आहे.
टीडब्ल्यूजेचे सीएमडी समीर नार्वेकर, संचालक नेहा नार्वेकर, चिपळूण व्यवस्थापक सिद्धेश कदम, पार्टनर संकेश घाग या चौघांविरोधात 19 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कामथे येथील प्रतिक दिलीप माटे यांनी चिपळूण पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार टीडब्ल्यूजेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलिसांनी आता चौकशी सुरू केली असून ठिकठिकाणी चौकशी सुरु आहे व टीडब्ल्यूजेच्या शाखा पोलिसांनी लक्ष्य केल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 02-10-2025