Sangameshwar : जांभ्या दगडाचा ट्रक पळवून नेणाऱ्या संशयिताला अटक

संगमेश्वर : जांभ्या दगडाने भरलेला ट्रक तहसीलदारांनी ताब्यात घेतल्यानंतर तो चोरून नेणाऱ्या संशयिताला देवरूख पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे पकडले. शरणबसप्पा तळवार (रा. कर्नाटक) असे संशयिताचे नाव आहे.

लांजा ते दाभोळे रस्त्यावर सुकमवाडीसमोरील रस्त्यावर ट्रक दगडाने भरलेल्या स्थितीत उभा होता. त्यावेळी महसूल विभागाने हा ट्रक ताब्यात घेऊन १७सप्टेंबरला देवरूख येथील शिवाजी चौकाजवळील वडाचे पाराजवळ उभा केला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 02/Oct/2025