Durga devi Visarjan : दुर्गादेवी विसर्जन; रत्नागिरी शहरातील वाहतुकीत बदल

रत्नागिरी : शहरातील दुर्गादेवींचे २ व ३ ऑक्टोबरला मांडवी समुद्रकिनारी विसर्जन होणार आहे. त्यामुळे या दिवशी दुपारी ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत भुतेनाका-भंडगतिठा ते मांडवी या मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. भुते नाका-मिरकरवाडा, तिठा-मत्स्यालय ते नाईक फॅक्टरीमार्गे या पर्यायी मार्गावर वाहतूक सुरू राहील.

याबाबत पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज वाहतूक नियंत्रण अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी सूचना दिल्या आहेत. मांडवी किनारी मूर्ती विसर्जनाकरिता सुमारे पाच ते सहा हजार लोकं एकत्रित येत असतात.

अशावेळी पार्किंगचा प्रश्न निर्माण होवू शकतो. हे लक्षात घेऊन जे भाविक देवीमूर्ती विसर्जनासाठी वाहने घेवून येणार आहेत, त्याच वाहनांना मांडवी किनारी जाण्यास प्रवेश दिला जाणार आहे. अन्य वाहनांना प्रवेश प्रतिबंध केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 02/Oct/2025