पावस : रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड शाळेत सरस्वती पूजन करण्यात आले. यानिमित्ताने आकर्षक देखावाही करण्यात आला होता. आरती, मुलांचे विविध कलागुणांना वाव देणारे गायनाचे कार्यक्रम, भोंडला, टिपरी नृत्य आदी कार्यक्रम झाले.
पोषण मासानिमित्त पालकांनी परिसरात उपलब्ध असलेल्या धान्यांपासून वेगवेगळे पोषक व आरोग्यदायी असे खाद्यपदार्थ तयार करून आणले होते. त्याचे प्रदर्शनही भरवण्यात आले. विद्यार्थी-पालक-शिक्षक यांचे स्नेहभोजन झाले. या उपक्रमासाठी सरपंच, ग्रामस्थ, शाळ व्यवस्थापन समिती, पालकांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाविषयी पावस बीट शिक्षण विस्तार अधिकारी भाग्यश्री हिरवे, केंद्रप्रमुख संजय राणे यांनी समाधान व्यक्त केले. उपक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 02/Oct/2025














