रत्नागिरी : खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या वृद्धाला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. मात्र प्रवासात तब्येत खालवल्याने पुन्हा उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना तपासून मृत घोषित केले. महादेव विश्वनाथ कोरे (वय ६२, रवींद्रनगर, कुवारबाव, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
ही घटना सोमवारी (ता. २९) दुपारी जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महादेव कोरे यांची तब्येत बिघडल्यामुळे शनिवारी (ता. २७) खासगी रुग्णालयात दाखल केले होते. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 02/Oct/2025














