खेड : महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भारतीय जैन संघटनेने विशेष अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. संस्थापक शांतिलाल मुथ्था यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच झालेल्या ऑनलाईन बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर सांखला, राजाध्यक्ष केतन शहा, राज्य महासचिव प्रवीण पारख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला, अशी माहिती संघटना राज्य समिती सदस्य उत्तमकुमार जैन यांनी दिली.
पूरग्रस्तांना जेवण-वैद्यकीय सेवा, जनावरांसाठी चारा, मृत्युमुखी पडलेल्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे पुनर्वसन यावर निर्णय घेण्यात आले. याशिवाय डिसेंबर-जानेवारीत जिल्हास्तरावर सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्याचाही ठोस निर्णय घेण्यात आला आहे. या संपूर्ण कार्याचे प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून प्रवीण पारख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी स्थानिक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती उत्तमकुमार जैन यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 02/Oct/2025














