चिपळूणमध्ये ५ हजार ५२१ मतदार घरातून मतदान करणार

चिपळूण : दिव्यांग व ८५ वर्षावरील नागरिक व मतदारांना घरीच मतदान करता येणार आहे त्यासाठी त्यांना एक फॉर्म भरून द्यायचा आहे. असे चिपळूणमध्ये ५५२१ मतदार आहेत. त्यांना घरातून मतदान करता येणार आहे.

चिपळूणमध्ये निवडणूक प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडावे यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिंगाडे यांनी सर्व तयारी सुरू केली आहे. गृह मतदानासाठी नमुना १२ ड तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनाही निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना केली आहे. १२ ड चे फॉर्म सर्व बीएलओ यांनी काळजीपूर्वक आपल्या भागातील पात्र मतदारांपर्यंत पोहोचतील यासाठी अधिक दक्षता घेण्यास त्यांनी सांगितले आहे. निवडणूक कामाच्या विविध जबाबदाऱ्यांसाठी कर्तव्यावर असलेले अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने दिली आहे. यासाठी नमुना क्र. १२ भरून द्यायचा आहे. मागणी करणाऱ्यांची पडताळणी करून त्यांना मतदान पत्रिका दिलेल्या कालमयदित मिळतील, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ही संख्या अधिक असल्याने त्याबाबत योग्य तो समन्वय साधून मतपत्रिकांच्या आदानपदानाबाबतची कार्यवाही दिलेल्या कार्यपद्धतीनुसारच करण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:44 PM 22/Oct/2024