खेड : भंगार व्यावसायिकाचे पत्रे चोरल्याच्या तक्रारीवरुन दोघांवर खेड पोलिस स्थानकात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. मंदार हुमणे (रा. पर्शुराम दुर्गेवाडी, ता. चिपळूण) आणि संकेत महाडिक (रा. पाली, ता. खेड) अशी या दोन संशयितांची नावे आहेत. भंगार व्यावसायिक सादिक कुरेशी यांनी याबाबत खेड पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. संशयितांनी ६४ हजार रुपयांचे पत्रे अॅपेरिक्षा टेम्पोतून चोरुन नेल्याची तक्रार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 02/Oct/2025














