Lanja : लांजा नगरपंचायतीची स्वच्छता मोहीम

लांजा : ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत लांजा नगरपंचायतीने बुधवारी सामूहिक स्वच्छता अभियान साटवली रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री केदारलिंग मंदिर, तसेच बाजारपेठेत प्रभावीपणे राबविण्यात आले.

बुधवारी मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत मुख्याधिकाऱ्यांसह अधिकारी आणि कर्मचारी, तहसीलदार प्रियांका ढोले, नायब तहसीलदार अनिल गोसावी व कर्मचारी, लांजा पोलिस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच लांजा शहर समन्वय समितीचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, तसेच त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. या स्वच्छता मोहिमेदरम्यान शहरात दीड टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:59 PM 02/Oct/2025