चिपळूण : घाणेखुंट-लोटे येथील एमईएस आयुर्वेद महाविद्यालयात ‘आयुरस्पेक्ट्रम २०२५’ या राष्ट्रीय स्तरावरील आयुर्वेद परिषद झाली. दहाव्या राष्ट्रीय दिवसानिमित्त ही परिषद घेण्यात आली.
परिषदेच्या उद्घाटनाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, ‘सीएसआर’ विभागप्रमुख डॉ. शाम भाकरे, डॉ. अशोक पाटील, आयुर्वेद व्यासपीठाचे सचिव डॉ. धनजंय कुलकर्णी, रत्नागिरी विभागाचे आयुर्वेद व्यासपीठ अध्यक्ष डॉ. मंजिरी जोग, प्रभारी प्राचार्य डॉ. सचिन उत्पात आदी उपस्थित होते. परिषदेमध्ये प्रामुख्याने सौंदर्यशास्त्र व मधुमेहावरील प्रतिबंधात्मक उपाय, स्त्रियांचे विकार, कॅन्सरवरील आयुर्वेद उपचार अशा विविध विषयांवर चर्चासत्रे झाली. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी वैज्ञानिक पेपर सादरीकरण सत्र झाले. देशभरातून आलेल्या संशोधकांनी आपले संशोधन प्रबंध मांडले. सुमारे १५० संशोधक व विद्यार्थी या सत्रात सहभागी झाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:04 PM 02/Oct/2025














