Sangameshwar : माखजन इंग्लिश स्कूल मध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती

संगमेश्वर : तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल व अड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती व लाल बहा‌दूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्या विषयी माहिती दिली. प्रशालेतील शिक्षक सचिन कदम यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना, सत्पूर्षांनी केलेल्या भारतमातेच्या सेवेविषयी व असीम त्यागा विषयी माहिती दिली. जयंती दिनी आपण कोणते विचार त्यांचे आचरणात आणले पाहिजेत याविषयीं माहिती दिली.

या दिनी स्वछता पंधरवडा साजरा करताना, संपूर्ण शाळेच्या परिसराची साफ सफाई करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक महादेव परब, ज्येष्ठ शिक्षक संतोष कुलकर्णी, सौ मानसी. कोवळे, सौ हर्षदा कदम, आदी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश जाधव यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 02/Oct/2025