Chiplun : सावर्डे विद्यालयात आरोग्य तपासणीचा १२०५ विद्यार्थ्यांना लाभ

सावर्डे : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या उपक्रमाचा लाभ इयत्ता ५ वी ते १० वीपर्यंतच्या एकूण १२०५ विद्यार्थ्यांना झाला.

ही तपासणी कामथे येथील बाळासाहेब माटे कुटीर रुग्णालयाच्या डॉ. दर्शन खोत यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अमोल दामोदर, डॉ. देवानंद खिलारे, डॉ. धीरज गवई, डॉ. प्रज्ञा नरवाडे, सीएचओ स्वाती सालवाड, सीएचओ पुनम घुगे, आरोग्य सहाय्यक प्रफुल्ल केळसकर, एएनएम दीपाली जाधव, एएनएम दर्शना भोपळे तसेच सावर्डे केंद्रातील आशा सेविका यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 02/Oct/2025