विजयादशमी निमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी विजयादशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. दसरा अथवा विजयादशमीचा सण सत्याचा असत्यावर व सत्प्रवृत्तीचा दुष्प्रवृत्तीवरील विजयाचे प्रतीक आहे.

हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान व संपन्नता घेऊन येवो या प्रार्थनेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:45 02-10-2025