राजापूर : राजापूर प्रतिष्ठानच्यावतीने कै. प्रकाश कातकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या पारंपारीक टिपरी नृत्य स्पर्धेत पारंपारीक टिपरी नृत्यकलेचा अविष्कार साऱ्यांना अनुभवायला मिळाला. ढोलकीच्या ठेक्यावर तालबद्द नृत्याला सुरेल आवाजाच्या मिळालेल्या साथीने रंगलेल्या या स्पर्धेचे शीळ गोंडाळवाडी नृत्य पथकाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर, हनुमान प्रसन्न खांबलवाडी-धोपेश्वर आणि श्री गणपती ठाणेश्वर गोठीवरे-सागवे या पथकांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटाकाविले. तर, महालक्ष्मी कणेरीवाडी-उन्हाळे या पथकाने उत्तेजनार्थ पारीतोषिक पटकाविले.
उन्हाळे येथील श्री महालक्ष्मी मंदीरामध्ये झालेल्या स्पर्धेच्या पारीतोषिक वितरण समारंभामध्ये सर्व विजेत्या संघाने मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसांसह आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले. राजापूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन पाडावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला नायब तहसिलदार दिपाली पंडीत, श्री महालक्ष्मी गंगातीर्थ विकास मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार पुजारे, शाहीर पिलाजी लोळगे, शाहीर सचिन हातणकर, अनिकेत कातकर, गावकर प्रकाश सोडये, गणपत सोडये, अॅड. सारीका लोळगे, अॅड. निखिल तेरवणकर यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. ह.भ.प. विश्वनाथ उर्फ भाई गोसावी महाराज यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या स्पर्धेचा शुभारंभ झाला. यावेळी नायब तहसिलदार दिपाली पंडीत, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर, पोलिस निरिक्षक अमित यादव, अॅड. शशिकांत सुतार, अॅड. प्रविण नागरेकर, राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे संचालक रमेश सूद, गिरीष विचारे, उन्हाळे सरपंच साक्षी सोडये, कोदवलीच्या सरपंच प्रणोती भोसले, आंगलेचे सरपंच श्रीधर सौंदळकर, धोपेश्वरचे सरपंच उमेश शिवगण, माजी सरपंच गणेश पाष्टेट, राजापूर तालुका पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पुजारे, माजी मुख्याध्यापक सत्यवान कणेरी, दुर्गेश बिर्जे, शुभांगी डबरे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, उन्हाळेचे ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
सात नृत्यपथकांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेसाठी शाहीर पिलाजी लोळगे, शाहीर सचिन हातणकर, नायब तहसिलदार दिपाली पंडीत यांनी परिक्षक म्हणून काम केले. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या नृत्यपथकांसह नवलादेवी शीळ, श्रीगणेश कृपा अणसुरे बाकाळे, श्री महालक्ष्मी सोडयेवाडी यां पथकांना सहभागाबद्दल स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध क्षेत्रामध्ये ठसा उमटविणाऱ्या महिलांसह उन्हाळे गाव आणि परिसरातील शाहीरांचा प्रतिष्ठानच्यावतीने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जिल्हा समन्वयक रविंद्र डोळस, माजी आमदार बाळ माने, माजी नगरसेवक विनय गुरव, राजापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, शिवसेनेचे दिपक बेंद्रे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष मनोहर गुरव, भाजपचे तालुकाध्यक्ष मोहन घुमे, आरडीसी बँकेचे व्यवस्थापक संजय बाकाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देवून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. राजापूर प्रतिष्ठानचे संस्थापक कै. प्रकाश कातकर यांच्या जीवनावर आधारीत शाहीर पिलाजी लोळगे यांनी स्वरचित गाण्याचे सादरीकरण केले. तर, प्रसिद्ध छायाचित्रकार राजेश खांबल यांनीही कै. प्रकाश कातकर यांच्या जीवनावर आधारीत लिहीलेल्या गाण्याचे हनुमान प्रसन्न खांबलवाडी-धोपेश्वर या पथकाने सादरीकरण केले. तर, नायब तहसिलदार दिपाली पंडीत यांनी नवरात्रौत्सवाच्या अनुषंगाने महिलांच्या जीवनावर आधारीत गाण्याचे सादरीकरण केले. त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन पाडावे यांच्या अध्यक्षतेखाली सचिव राजू कार्शिगकर, गोपाळ गोंडाळ, सुभाष नवाळे, सुधीर विचारे, संतोष तांबे, अशफाक मापारी, दिनेश चौगुले, दिलीप नलावडे, अक्षय कशेळकर, दिपक बावकर, निलेश फाटक, गौरव सरवणकर, मंगेश तिर्लोटकर, सुबोध पवार, दिपक कुडाळकर, दशरथ पुजारी, अनिल पुजारी, पांडुरंग सोडये, मंथन नवाळे, सौरभ तेरवणकर, सायली पुजारी, प्रगती पुजारी, प्रतिक्षा गोंडाळ, समता नवाळे, मनस्वी नवाळे आदींनी मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 03/Oct/2025














