नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी सुमारे ४९.१९ लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६८.७२ लाख निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्ता (डीए) आणि महागाई मदत (डीआर) मध्ये ३ टक्के वाढ केली आहे. महागाई भरपाईसाठी मूळ वेतन, निवृत्ती वेतनाच्या सध्याच्या ५५ टक्क्यांवर ३ टक्क्यांची ही डीए, डीआर वाढ १ जुलै २०२५ पासून लागू होणार आहे.
कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, डीए आणि डीआरमधील वाढीमुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी १०,०८३.९६ कोटी रुपये एवढा एकत्रित परिणाम होईल.
सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित स्वीकारलेल्या सूत्रानुसार ही वाढ करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती देताना सांगितले की, डीए आणि डीआरमध्ये झालेल्या या वाढीमुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक १०,०८३.९६ कोटींचा एकत्रित बोजा पडेल. सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर
आधारित मान्य केलेल्या सूत्रानुसार ही वाढ करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 03/Oct/2025














