संगमेश्वर : तालुक्यातील माखजन आरवली रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या गंभीर प्रश्नाकडे शासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्या तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होत आहे. माखजन आरवली हा १० किमी अंतराचा रस्ता असून हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याला मोठी वर्दळ पाहायला मिळते.
पावसाळा सुरु झाल्यापासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठाले खड्डे पडले असून वाहन चालकांना मोठ्या त्रासाला समोरे जावे लागत आहे. या रस्त्याची डागडुजी योग्य प्रकारे सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ व वाहन चालकांक कडून केली जात आहे. परंतु या मागणी ला सतत केरची टोपली दाखवण्यात आली.
या रस्त्यावरून् शाळकरी मुलांसह अन्य चिपळूण रत्नागिरीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सतत एसटी सेवा सुरु असते. याचा त्रास साहाजिकच त्रास एसटी वाहतुहीवर होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन हे खड्डे बुजवावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:31 PM 03/Oct/2025














