लांजा : पाच वर्षांच्या मुलासह विवाहिता बेपत्ता

लांजा : पाच वर्षांच्या मुलासह विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ही घटना लांजा शहरातील आडाचा मार्ग येथे रविवारी सायंकाळी घडली.

याबाबतची फिर्याद वसिम हुसेन नाईक (४२, मुळ राहणार भांबेड गुरववाडी, सध्या रा. लांजा आडाचा मार्ग) यांनी दिली आहे. त्यांची पत्नी आरजू वसीम नाईक (वय ३५) ही मुलगा अबूजर वसीम नाईक (वय ५ वर्षे) हे रविवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आपण बाजारात जाऊन येतो असे मोठा मुलगा अल्ताफ याला सांगून घराबाहेर पडली. मात्र ती घरी न परतल्याने तसेच नातेवाईक व शेजारीपाजारी गावात सगळीकडे शोध घेऊनही कुठेही थांगपत्ता न लागल्याने पती वसीम नाईक यांनी अखेर लांजा पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली.

याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड या करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:48 22-10-2024