राजापूर : शासनाच्या वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंर्गत राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघातील विविध तांडा वस्त्यांच्या सुधारणासाठी महायुती सरकारकडून तब्बल दोन कोटी पन्नास लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री ना. अतुल सावे यांनी हा निधी मंजूर केला आहे. भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेश सचिव शिल्पा मराठे यांनी केलेला विशेष पाठपुरावा आणि प्रयत्नाने हा निधी मंजूर झाला आहे.
शासनाकडून तांडावस्तीतील विविध विकास कामांसाठी मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाल्याने या भागाच्या विकासाला गती मिळणार आहे. राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघातील विविध तांडा वस्त्यांच्या विकास कामांसाठी आपण स्वता विविध कामे सुचवली होती. याबाबतचा प्रस्ताव राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री ना. अतुल सावे यांच्याकडे दिली होता. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता, त्याला अखेर यश आले असून राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघातील विविध तांडा वस्त्यांतील विकास कामांना निधी मंजूर झाला आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, पालकमंत्री ना. उदय सामंत, आमदार किरण सामंत यांनी यासाठी विशेष सहकार्य केल्याचे मराठे यांनी सांगितले. राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघातील तांड वस्ती सुधारणा योजनेतुन एकूण १९ कामे होणार आहेत यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी हद्दीतील तांबळवाडी रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, किरबेट भावडे ग्रामपंचायत अंतर्गत तुकाराम वाजे यांच्या घराकडे जाणारा रस्ता तयार करणे १५ लाख, राजापूर तालुक्यातील दोनिवडे गवळवाडी ते राष्ट्रीय महामार्ग रस्ता सुधारणा करणे ५ लाख, कोतापूर तेरवण तिठा धनगरवाडी पांडुरंग शेळके घर ते कळंबा माता मंदिरापर्यंत रस्ता सुधारणा करणे १५ लाख, कोतापूर कलमकाटे धनगरवाडी बोडेकर घर ते तुकाराम जांगली घरापर्यंत गटार लाईन करणे व पाईप मोरी बांधणे १५ लाख, कोतापूर देवीहसोळ मुख्य रस्ता गोंडयाची निवई धनगरवाडी रस्ता सुधारण करण्डो १५ लाख, पेंडखळे धनगरवाडी स्मशानभूमी ते रामचंद्र गोरे घर रस्ता दुरूस्ती व डांबरीकरण करणे १५ लाख, ओझर मुख्य रस्ता ते धनगरवाडी रस्ता सुधारणा करणे २५ लाख, दसूर भंडकंवा ते धनगरवाडी रस्ता सुधारणा करणे २५ लाख, आजिवली मुख्य रस्ता ते मानेवाडी धनगरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे १५ लाख, ताम्हाणे पहिलीवाडी धनगरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ५ लाख आदी कामांचा समावेश आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:01 AM 04/Oct/2025














