रत्नागिरी : मद्याच्या नशेत आंबा फवारणीचे विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महेश बळीराम ठिक (३५, रा. वांद्री, ता. संगमेश्वर) असे आंबा फवारणीचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वा. सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. महेश ठिक यांनी मद्याच्या नशेत बुधवारी रात्री ८ वा. सुमारास आंबा फवारणीचे औषध प्राशन केले होते. तात्काळ नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 04/Oct/2025














