चिपळूण : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी वर्ग गंभीर संकटात सापडला आहे. शासनाने ओला दुष्काळ घोषीत करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी तसेच दर हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी चिपळूण तालुका काँग्रेस कमिटीने प्रांताधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
काँग्रेसच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने अद्याप कोणताही दिलासा दिलेला नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही राज्यांत पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर पंतप्रधानांनी तातडीने दौरे केले; मात्र महाराष्ट्रात आजपर्यंत दौरा केला नसल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी, त्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी आणि ओला दुष्काळ घोषित करून दिलासा द्यावा, अशी ठाम भूमिका या निवेदनात घेण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग, तालुकाध्यक्ष लियाकत शाह, शहराध्यक्ष संतोष सावंत देसाई, तालुक उपाध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष सुबोध सावंतदेसाई, माजी नगरसेवक कबीर काद्री, यशवंत फके, कांता चिपळूणकर, डॉ. सरफराज गोठे, अजित शिंदे, लियाकत शेख, राजेंद्र भुरण, इंतिखाब चौगुले, दादा आखाडे, महादेव चव्हाण, महिला तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, शहराध्यक्ष विणा जावकर, सफा गोठे, नंदा भालेकर, साजिद सरगुरोह, अ. ल. माळी, डॉ. दीपक विखारे, अनिल रेपाळ, सुनिल खेडेकर, विनायक जाधव, सुरेश राऊत, कैसर देसाई उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 04/Oct/2025














