सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर समुद्रात पर्यटनासाठी गेलेले कुडाळ तालुक्यातील पिंगुळी आणि बेळगाव जिल्ह्यातील लोंढा येथील पर्यटकांवर काल काळाने घाला घातला. तळकोकणातील शिरोडा वेळागर समुद्रात काल सायंकाळी ९ पर्यटक बुडाले.
त्यातील एक पर्यटक स्वतः बाहेर आला, तर एका जणांला वाचवण्यात यश आलं.
इतर आठ पर्यटकांपैकी एकाला वाचवण्यात आले. आतापर्यंत चौघांचे मृतदेह सापडले. तर तीनजण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
आज सकाळी शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या पर्यटकांपैकी अजून एकाचा मृतदेह आरवली सागरतीर्थ येथे सापडला. लोंढा-बेळगाव येथील कित्तुर कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडले आहेत.
इसरा इम्रान कित्तूर, वय वर्ष १७. रा. लोंढा, बेळगाव या तरुणीला समुद्रातून बाहेर काढण्यात आले आहे.
फरहान इरफान कित्तूर, लोंढा-बेळगाव, इबाद इरफान कित्तूर , लोंढा-बेळगाव आणि नमीरा आफताब अख्तर ल, रा. अल्लावर, बेळगाव ह्या तिघांचा मृत्यू झाला आहे.
बेपत्ता झालेले पर्यटक: इरफान मोहम्मद इसाक कित्तूर, लोंढा-बेळगाव इक्वान इमरान कित्तूर, लोंढा-बेळगाव ,फरहान मोहम्मद मणियार, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग ,जाकीर निसार मणियार, रा. कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 04-10-2025














