‘दिवाळीचा फराळ थेट परदेशी’ पोस्ट ऑफिसची तत्पर सेवा

रत्नागिरी : जिल्ह्यातील अनेक नागरिक कामानिमित्त बाहेरगावी किंवा परदेशात जातात. अशा नागरिकांना दिवाळीत आपल्या घरचा फराळ मिळावा यासाठी पोस्ट ऑफिसमार्फत परदेशात फराळ पाठवला जात आहे.

आपल्या घरातील व्यक्तींना व नातेवाईकांना दिवाळीचा फराळ परदेशात मिळावा याकरिता पार्सल पाठविण्यासाठी सर्व पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे. रत्नागिरी डाक विभागामार्फत रत्नागिरी प्रधान डाकघर व चिपळूण प्रधान डाकघर येथे पॅकिंगची देखील सुविधा करण्यात आली आहे.

फराळ परदेशात पाठवण्यासाठी पार्सलचे दर १० किलोला देशनिहाय पुढीलप्रमाणे आहेत. ऑस्ट्रेलिया ११ हजार ९१२ रुपये, कॅनडा ९ हजार ६७६ रुपये, अमेरिका ९ हजार ५१ रुपये, यु.ए.ई. ३ हजार ४९३ रुपये, रशिया ६ हजार ७५० रुपये, यु.के. ६ हजार ४६१ रुपये, जपान ४ हजार ७९७ रुपये. पोस्ट ऑफिसच्या सेवेचा जिल्हयातील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन एन.टी. कुरळपकर, अधीक्षक डाकघर रत्नागिरी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:23 22-10-2024