Ratnagiri : शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती

रत्नागिरी : रत्नागिरी तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी समृद्धी पंधरवडा राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात येत आहे. यासंदर्भात दि. १६ ऑक्टोबरपर्यंत कृषी मेळावे घेण्यात येणार आहेत.

तालुक्यातील कोतवडे, उंबरवाडी ग्रामपंचायतीमध्ये कृषी विभागाच्या नवीन कृषी समृद्धी योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व घटकांची माहिती देण्यात आली. मंडळ कृषी अधिकारी विकास मेढे, सहायक कृषी अधिकारी गणेश जुवळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ९२ शेतकरी उपस्थित होते. कळझोंडी येथील शिबिराला मालगुंडचे प्रभारी मंडळ कृषी अधिकारी प्रदीप भुवड, कृषी सेवक कृष्णा गाढवे उपस्थित होते.

झरेवाडी ग्रामपंचायत कार्यालयातही मार्गदर्शन शिबिर पार पडले. यावेळी पाली मंडळ कृषी अधिकारी सचिन ढेरे, कृषीसेवक अजय कल्याणकर यांनी मार्गदर्शन केले. ओरी येथेही शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर शिबिर आयोजित केले होते. कृषिसेवक अजय मोहिरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच स्वाती देसाई, उपसरपंच अनिल घवाळी, महेश घवाळी उपस्थित होते. नाणीज येथील शिबिरात विविध योजनांची माहिती देण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 04/Oct/2025