निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पतसंस्था, बँकांमधून 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास वा जमा केल्यास होणार चौकशी

रत्नागिरी : दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम रोखीने जमा किंवा काढले असल्यास त्याबद्दल आयकर विभागास दैनंदिन अहवाल सादर करण्याच्या सूचना बँका आणि पत संस्थांना देण्यात आल्या आहेत. पतसंस्थांनी अहवाल सादर केला किंवा नाही याबाबत सहकार विभागास दैंनदिन अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. सोपान शिंदे यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा किंवा काढली गेली असेल तर ती आयकर खात्याच्या समोर यावी यासाठी दक्षता घेतली गेली आहे. पतसंस्था आणि बॅकांना त्याचा अहवाल आयकर खात्याला कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक काळात रोकड पैसे वाटप मोठया प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी येत असतात. ते रोखण्यासाठी हे धोरण स्वीकारले गेले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:48 22-10-2024