Earbuds and Hearing Loss : वायरलेस हेडफोन्स कानासाठी घातक?

अनेकजण रस्त्यावर, कामात किंवा झोपताना हेडफोन/इयरफोन वापरतात; कधी कधी दुसऱ्यांना त्रास होऊ नये म्हणूनही हेडफोन वापरला जातो

बाहेरच्या जगाचा पूर्ण आवाज थांबवण्याची क्षमता असलेला वायरलेस हेडफोन हा कानाला किती नुकसान पोहोचवू शकतो याचा अनेकदा आपल्याला अंदाज लावता येत नाही.

आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच हेडफोन्सचा वापर करतात.

वायरलेस हेडफोनचा सतत वापर कानांसाठी धोकादायक ठरू शकतो. यामुळे आपल्या ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.

संशोधनात आढळले की, 12 ते 34 वर्षे वयोगटातील 24% लोक सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त आवाजात गाणी ऐकतात.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, जगभरात जवळपास 43 कोटी लोकांना ऐकण्यात गंभीर समस्या आहेत. 85 डेसिबलपेक्षा जास्त आवाज आठ तास किंवा त्यापेक्षा जास्त ऐकल्यास ऐकण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ शकते.

ऐकण्यासोबतच कानात इतर समस्या देखील होऊ शकतात. कानात घाम आणि बॅक्टेरिया जमा होतात, त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकते.

NIH आणि FDA च्या अभ्यासानुसार, हेडफोन्समधून होणारे रेडिएशन हे फार कमी असते तसेच, यामुळे कोणताच धोका जाणवत नाही.

हेडफोन्समुळे कर्करोग किंवा मोठा धोका होत नाही. पण, सतत वापरल्यास कानात समस्या होऊ शकते.

WHO च्या संशोधनानुसार, हेडफोनवर 60% पेक्षा जास्त आवाज ऐकू नका आणि 1 तासापेक्षा जास्त ऐकू नका. तसेच, आवाज कमी करणारे हेडफोन वापरा.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:32 04-10-2025