मिरकरवाडा येथे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

रत्नागिरी : विधानसभा निवडणूक झहीर होताच आदर्श आचारसंहितेला सुरुवात झाली आहे. यामुळे पोलिसांकडून ठिकठिकाणी कोंबिंग ऑपरेशन देखील राबवण्यात येत आहे. आज रात्री रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथे शहर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या कारवाईत १ प्रोबेशन डिवायएसपी, २ पीएस आय, ३० आरसीपी अमंलदार आणि ८ डी बी कर्मचारी उपस्थित होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून विविध ठिकाणी कसून तपासणी करण्यात येत आहे.