चिपळूण : दिव्यांग पाच टक्के राखीव अनुदानातील निःसमर्थ व्यक्तींसाठी राखून ठेवलेली रक्कम एका अर्जाद्वारे मंजूर करून घेत फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील एका महिलेविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संतोष शांताराम मोहिते (५०) चिपळूण नगर परिषद सफाई कामगार यांनी या बाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधित महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतच्या माहितीनुसार, शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार न.प. मध्ये दिव्यांग योजनेअंतर्गत ५ टक्के अनुदानित रक्कम निःसमर्थ व्यक्तींसाठी राखून ठेवण्यात येते. वैयक्तिक लाभ योजनेतील हा निधी एका महिलेने ३१ जुलै २०१९ च्या अर्जानुसार मंजूर करून संबंधित रक्कम रू. ३ लाख २४ हजार रूपये १८ सप्टेंबर २०१९ च्या सुमारास घेतली. परिणामी, संबंधित महिलेने चिपळूण न.प. मुख्याधिकाऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार संतोष मोहिते यांनी केली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:59 AM 06/Oct/2025














