Chiplun : चिपळुणातील डोंगराळ, दुर्गम वस्ती सौरदिव्यांनी उजळणार !

चिपळूण : तालुक्यातील डोंगराळ, दुर्गम वस्तीमध्ये राहणाऱ्यांसाठी आ. शेखर निकम यांच्या माध्यमातून वाडीवाडीत सौर ऊर्जेवर चालणारे पथदीप उजळणार आहेत. वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेंतर्गत १ कोटींचा निधी सौर ऊर्जा स्ट्रीट लाईटसाठी मंजूर करून आ. निकम यांनी मतदारांना मोठी भेट दिली आहे.

यामध्ये मौजे कोंडमळा धनगरवाडी, कोसबी धनगरवाडी, वेहेळे भोजनेवाडी, डेरवण धनगरवाडी, सावर्डे धनगरवाडी, पोफळी एनाचे तळे आणि करजवाडा १ व २, तळसर शेवरीचा दंड, कोळकेवाडी जांभरई/वाडसाडी, मालदोली भोईवाडी, भिले भोईवाडी या भागांतील ग्रामस्थांना पथदीप नसल्याने अनेक अडचणीना सामोरे जावे लागत होते. अंधार पडल्यानंतर घराबाहेर पडणे जिकिरीचे होत होते. वन्यप्राण्यांच्या वावरामुळे कायम जिवघेणा धोका असायचा; मात्र आता हे चित्र बदलणार आहे. या सौर पथदीपांमुळे नागरिकांना रात्री-अपरात्री सुरक्षितपणे प्रवास करता येणार आहे, वीज बिलाचा कोणताही खर्च होणार नाही. या सुविधेमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 06/Oct/2025