चिपळूण : उपचारासाठी पैसे पाठविल्याच्या बहाण्याने चिपळुणात वास्तव्य असलेल्या एका हवाई दलातील निवृत्त कर्मचाऱ्याची ऑनलाईन लाखो रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतच्या माहितीनुसार, मूळ पुणे बाणेरे येथील रहिवासी असलेले व सध्या शिवाजीनगर चिपळूण येथे वास्तव्यास असलेले हवाई दलातील निवृत्त अधिकारी अरुण पुरुषोत्तम बापट (६८) यांना १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७:१५ ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान मोबाईलद्वारे मित्राच्या आवाजात फोन करून उपचारासाठी तुमच्या खात्यावर पैसे पाठविल्याचे सांगत संबंधित रक्कम ऑनलाईन पद्धतीने अज्ञात व्यक्तिने काढून सुमारे १ लाख १५ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बापट यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 06/Oct/2025














