गणपतीपुळे : कोल्हापूर येथे विभागीय रायफल शुटिंग स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व जिंदल विद्या मंदिर रत्नागिरी या प्रशालेने केले. त्यामध्ये या प्रशालेची विद्यार्थिनी देवर्षी शैलेश कासार हिने रायफल शुटिंग स्पर्धेत सिल्व्हर मेडल प्राप्त केल्याने तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या विद्यार्थिनीचे शाळेचे पर्यवेक्षक दिपक दरडी तसेच शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष विजय इंगवले यांनी अभिनंदन केले. या यशस्वी विद्यार्थिनीला शाळेचे क्रडाशिक्षक रणजीत जाधव, विनोद पिल्ले व मिथिला मोरे यांनी विशेष मार्गदर्शन केले. रायफल शूटिंग स्पर्धेत देवर्षी हिने विभागीय स्पर्धेसाठी निवड प्राप्त केल्याबद्दल शाळेतील शिक्षक वृंदानी तिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 06/Oct/2025












