Ratnagiri : तरुणाच्या डोक्यात दगड मारून दुखापत

रत्नागिरी : दारूच्या नशेत तरुणाला शिवीगाळ करत डोक्यात दगड मारून दुखापत करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना गुरुवारी (ता. २) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मांडवी ते नाईक कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. आयुष पारकर (रा. राजिवडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात अजय सुभाष तोडणकर (वय २७, रा. चवंडेवठार, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

तक्रारीनुसार गुरुवारी रात्री अजय तोडणकर व त्याचा मित्र संदीप शिंदे (रा. खडपेवठार), दत्तात्रय खाडे (रा. बसस्थानक परिसर) आणि संशयित आयुष पारकर हे चौघे दोन दुचाकीवरून नाईक कंपनी ते मांडवी जाणाऱ्या रस्त्यावर गेले. त्या ठिकाणी थांबून अजय तोडणकर हा संदीप शिंदेसोबत बोलत होता. तेव्हा आयुष पारकरने अज्ञात कारणातून दारूच्या नशेत अजय तोडणकरला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा अजयने आयुषला तू माझी लायकी का काढली? अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने आयुषने बाजूचा दगड घेऊन तो अजयच्या डोक्यात मारला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 06/Oct/2025