Chiplun : मित्राच्या आवाजात फोन करून वृद्धाला फसवले

चिपळूण : मित्राच्या आवाजात अज्ञात व्यक्तीने चिपळुणातील एका वृद्धाला फोन करून एक लाख पंधरा हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. १ ऑक्टोबरला हा प्रकार घडला. ४ ऑक्टोबरला तो चिपळूण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. चिपळूण शहरातील शिवाजीनगर येथे राहणारे अरुण पुरुषोत्तम बापट (वय ६८) यांनी यासंदर्भात चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

त्यांना त्यांच्या मित्राच्या आवाजात १ ऑक्टोबरला मोबाईलवर कॉल आला. मित्र आजारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून वैद्यकीय उपचारासाठी पैसे मागितले. बापट यांनी संबंधित मोबाईलवर ऑनलाईन पैसे पाठविले. नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बापट यांनी चिपळूण पोलिसात तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 06/Oct/2025