रत्नागिरी : शिवसेना शिंदे गटाच्या रत्नागिरी तालुक्याची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून विधानसभा क्षेत्र संघटक पदाची जबाबदारी सुदेश मयेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्याची कार्यकारणी जाहीर केली, त्यामध्ये विधानसभा क्षेत्र संघटक पदी सुदेश मयेकर यांची निवड केली.
सुदेश मयेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये मते सुद्धा त्यांनी चांगली घेतली होती. यादरम्यान त्यांनी संपूर्ण रत्नागिरी तालुका पिंजून काढला होता. शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करून त्यांनी सामंत बंधू सोबत काम करायला सुरुवात केली सध्या ते नामदार उदय सामंत यांचे विश्वासू सहकारी म्हणून पुढे येत आहे. सुदेश मयेकर यांचे या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 06-10-2025














