राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील ओणीनजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार शनिवारी (ता. ४) रात्रीच्या सुमारास घडला. मृत झालेला बिबट्या हा नर जातीचा असून सुमारे ३ ते ४ वर्षांचा असल्याची माहिती वनविभागातर्फे देण्यात आली.
ओणी येथे मृतावस्थेत बिबट्या असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी वनविभागाला दूरध्वनीद्वारे सांगितले. राजापूर वनविभागाने तत्काळ परिक्षेत्र वन अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी लांजा ते राजापूर जाणाऱ्या महामार्गाच्या उजव्या बाजूला बिबट्या निपचित पडलेला दिसून आला. जवळ जाऊन त्याची पाहणी केली असता बिबट्याच्या तोंडाला व डोक्याला गंभीर इजा झाल्याचे दिसले. त्यावरून वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 06/Oct/2025














